मुंबई : अंधेरीतील डान्सबारमधल्या ‘त्या’ छुप्या खोलीचा पाेलिसांनी केला पर्दाफाश | पुढारी

मुंबई : अंधेरीतील डान्सबारमधल्या 'त्या' छुप्या खोलीचा पाेलिसांनी केला पर्दाफाश

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

ही बातमी आहे आरशामागे दडलेल्या एका रहस्याची… हा आरसा होता मुंबईतील अंधेरीमधल्या एका बारचा..,जेव्हा जेव्हा पोलीस अंधेरीतल्या दीपा बारवर छापा मारायचे तेव्हा तिथल्या बारबाला क्षणार्धात गायब व्हायच्या…

काल रविवारी देखील मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने छापा मारला. सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही… अखेर पोलिसांची नजर भल्या मोठ्या आरशाकडे गेली.

आरशाचा आकार गरजेपेक्षा मोठा दिसल्यानं पोलिसांनी त्यावर हातोडा चालवला. या आरशामागे बारबालांना लपवण्यासाठी छुपी खोली तयार करण्यात आली होती. तसेच पोलिसांचा छापा पडताच बारबालांना बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्गही तयार करण्यात आला होता. जवळपास 15 तास चाललेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी 17 बारबालांना अटक केली. तसेच बारचा मॅनेजरसह तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचले का ?

Back to top button