Lok sabha Election 2024 Results : लोकसभा निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निकालाचे चिंतन…

Lok sabha Election 2024 Results : लोकसभा निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निकालाचे चिंतन…

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. निकालानंतर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेला लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू" असे त्यांनी म्हटले आहे.

"इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर ट्विटमध्ये लिहिले आहे.

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news