Lok sabha Election 2024 Results : मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एनडीए’चे सरकार स्‍थापन हाेईल : मुख्यमंत्री शिंदे

Lok sabha Election 2024 Results : मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एनडीए’चे सरकार स्‍थापन हाेईल : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेना त्यांच्यासोबत कायम आहे. लवकरच नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात 'एनडीए'चे सरकार स्‍थापन हाेईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करत इंडिया आघाडीने मोदी हटाव, या एकाच द्वेषाने पछाडलेले होते. द्वेषाने पछाडलेले लोक मोदींना तडीपार करण्याची एकच भाषा बोलत होते; परंतू देशातील जनतेने विकासाला मतदान केले आहे. जे तडीपारची भाषा करत होते त्यांनाच सत्तेपासून दूर ठेवत तडीपार केले आहे. यापुढेही विकासाच राजकारण करु, राज्यामध्येही विकालासा प्राधान्य असेल, अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.४) माध्‍यमांशी बाेलताना दिली. ( lok sabha election 2024 )

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

  • ठाणे मतदारसंघात केलेले कामाची पोचपावती या विजयातून मिळाली
  • महायुतीचा भगवा झेंडा ठाणे मतदारसंघात विजयाच्या रुपाने डौलाने फडकत आहे
  • नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत
  • ठाणे मतदारसंघाने खऱ्या शिवसेनेचा पहिला खासदार दिला

लोकसभा निवडणूक मतमोजणी झाली. दरम्यान ठाणे मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "एक सर्वसामान्य कार्यकर्ता ठाणे मतदारसंघामधून उमेदवार होता. सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित राहीला. ठाण्यामध्ये लोकांना विकासाला मतदान केलं. कारण गेले अनेक वर्षे  ठाणे मतदारसंघात झालेला विकास आणि केलेलं काम. राज्यसरकारने गेल्या दोन वर्षात केलेले काम, मोदी सरकारने १० वर्षात केलेले काम याची पोचपावती मतदारांनी या विजयातून दिली आहे, असल्‍याचेही शिंदे त्‍यांनी सांगितले. ( lok sabha election 2024 )

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला,  धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांचा बालेकिल्ला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच प्रेम असलेला बालेकिल्ला ठाणे मतदार संघ येथे महायुतीचा भगवा झेंडा विययाच्या रुपाने डौलाने फडकत आहे. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जवळपास २ लाखापेक्षा मताधिक्य मिळालं आहे. त्याबदद्ल पुन्हा एकदा मी मतदार, महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असेही मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले.

कारणमीमांसा आम्ही नक्की करु…

खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाण्याने दिला आहे. मी ठाण्यातील मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो. नरेश म्हस्के या मतदारसंघात विकासाच काम करतील त्या विश्वासाला पात्र ठरतील. काही ठिकाणी आमच्या जागा काहीच मतांनी गेल्या तर, काही ठिकाणी उमेदवारी जाहीर करायला आम्हाला वेळ झाला हेही पराभूत हाेण्‍याचे कारण असले तरी याची कारणमीमांसा आम्ही नक्की करु, असेही शिंदे म्‍हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news