Lok sabha Election 2024 Results : नांदेडमध्ये अशोक चव्हाण, प्रताप पाटील यांना धूळ चारणारे वसंत चव्हाण आहेत कोण?

प्रताप पाटील, अशोक चव्हाण, वसंत चव्हाण
प्रताप पाटील, अशोक चव्हाण, वसंत चव्हाण

पुढारी ऑनलाईन डेस्क: नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. नांदेडचे दोन वेळा खासदार राहिलेले प्रतापराव पाटील- चिखलीकर यांचा त्यांनी पराभव करत धूळ चारली. भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील चव्हाण यांनी मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेड कॉग्रेसचा बालेकिल्ला राहणार नसल्याचे बोलले जात होते. परंतु, कॉग्रेसला बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यात यश आले आहे.

नांदेडमधून निवडून आलेले वसंत चव्हाण आहेत कोण?

नांदेड लोकसभा मतदारसंघातून दिवंगत माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांचे पुत्र वसंत चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. नायगाव विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती.

१९७८ मध्ये ते नायगावचे सरपंच होते.

१९७८ मध्ये ते नायगावचे सरपंच होते. १९९० ते २००२ पर्यंत ते जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून निवडून येत होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. २००२ मध्ये ते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवड गेले होते.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून जिंकली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला समोरे जावे लागले.

त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेत चेअरमन म्हणून काम केले आहे. माज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक होते. चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसने नांदेड लोकसभेसाठी वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरविले. नायगाव, मुखेड, देगलूरमध्ये त्यांचे वर्चस्व आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news