Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटाची घटना दुर्दैवी , 8 जणांना बाहेर काढले : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटाची घटना दुर्दैवी , 8 जणांना बाहेर काढले : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर -डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना अतिशय दु:खद आहे. आठ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. (Dombivli MIDC Blast)

  • अनुदान केमिकल कंपनी एमआयडीसी फेज २ मध्ये आहे.
  • या कंपनीत आज (दि.२३) दुपारी दोनच्या सुमारास बॉयलरचे लागोपाठ चार ते पाच स्फोट झाले.
  • या स्फोटामध्ये संपूर्ण कंपनी बेचिराख झाली.

घटना अतिशय दु:खद : देवेंद्र फडणवीस

नागपूर – डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत (Dombivli MIDC Blast) बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना अतिशय दु:खद आहे. आठजण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या घटनेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही घटनास्थळी पोहोचले आहेत. यासोबतच एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

स्फोटांमुळे आसपासचा परिसर हादरला

लागोपाठ एका मागोमाग एक कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांमुळे आसपासचा परिसर हादरला. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. परिसरातील रहिवासी भयभित होऊन घराबाहेर पडले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला. घटनास्थळी चार-पाच ॲम्बुलन्स दाखल झाल्या आहेत. मात्र कंपनीत भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशामक दलाच्या जवानांना अद्याप यश आलेले नाही. कंपनीमध्ये नेमके किती जण अडकले आहेत? ही आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा 

 

Back to top button