मुंबई : लोकलचा डबा रूळावरून घसरला; सीएसएमटी ते पनवेल वाहतूक विस्‍कळीत | पुढारी

मुंबई : लोकलचा डबा रूळावरून घसरला; सीएसएमटी ते पनवेल वाहतूक विस्‍कळीत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा हार्बर लाईन मार्गावरून पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस धावणाऱ्या लोकलचा सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी एक डबा रुळावरून खाली घसरला. यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली.

आज (सोमवार) सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल मस्जिद बंदर स्थानकातून पुढे निघाली होती. सीएसएमटी स्थानकात येण्यापूर्वी लोकलच्या डब्याची चाके रुळावरून खाली घसरली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूकिचे मात्र तीनतेरा वाजले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button