Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे अटकेत | पुढारी

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे अटकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी गुजरातच्या भुज येथून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या १० टीम ५ राज्यात तपास करत होत्या. दोन्ही आरोपींना मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

वांद्रे पश्चिममधील अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारातील आरोपींची ओळख पटली आहे. दोन्ही आरोपींना मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. हा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. लॉरेन्स गँगमधील अनमोल विश्नोई, गोल्डी ब्रार व रोहित गोदराने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारासाठी वापरलेली मोटारसायकल त्यांनी रायगडमधून खरेदी केली होती.

हेही वाचा : 

Back to top button