Amol Kirtikar : अमोल कीर्तिकरांची आज ईडी चौकशी | पुढारी

Amol Kirtikar : अमोल कीर्तिकरांची आज ईडी चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे (UBT) नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.८) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कोविड १९ खिचडी घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कीर्तिकर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

शिवसेनेने (ठाकरे गट) अमोल कीर्तिकर यांना २७ मार्चला तिकीट दिले होते. नाव निश्चित झाल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांना ईडीचे समन्स मिळाले. यानंतर, त्यांना २९ मार्च रोजी दुसरे समन्स प्राप्त झाले, ज्यामध्ये ईडीने त्यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी आज ८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

हेही वाचा : 

Back to top button