Aaditya Thackeray : मुंबईत गेल्‍या १९ दिवसांमध्‍ये दक्षिण आफ्रिकेतून आले १ हजार प्रवासी : आदित्‍य ठाकरे | पुढारी

Aaditya Thackeray : मुंबईत गेल्‍या १९ दिवसांमध्‍ये दक्षिण आफ्रिकेतून आले १ हजार प्रवासी : आदित्‍य ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचा मुंबई महापालिकेकडून शोध घेतला जात आहे. 10 नोव्हेंबर पासून दक्षिण आफ्रिकेतून सुमारे एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रवाशांचा शोध घेतला जात असून त्यांना कोरोना आजाराची कोणती लक्षणे आहेत का, याची तपासणी सुरू आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी आज दिली.

Aaditya Thackeray : कोविड सेंटर पुन्हा सज्ज ठेवण्याचे आदेश

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांची व आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले तर कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत आढावा घेण्यात आला. कोविड सेंटर पुन्हा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. दोन ते तीन देश आजही लॉकडाऊनमध्ये आहेत. पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचे असल्याचेही यावेळी आदित्‍य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी सांगितले.

विमान कंपन्यांना हमी घ्यावी लागणार

विमान प्रवासासाठी तिकिट आरक्षित करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी, अशी सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button