

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी उद्या (दि.२६) जाहिर होणार आहे. यामध्ये १५ ते १६ उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि.२५) मुंबई येथे सांगितले. डॉ. प्रकाश आंबेशकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ४ जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांनी तो मान्य करावा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
आज माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "डॉ. प्रकाश आंबेडकर यांना ४ जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी मविआसोबत यावं अशी इच्छा आहे. ज्या जागा त्यांनी मागितल्या होत्या, त्या जागा दिल्या आहेत. त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांनी प्रस्ताव मान्य करायला हवा. आता निर्णय घेणे त्यांच्याच हातात आहे," असे राऊत यांनी म्हटले आहे.
यावेळी खासदार राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपची दरोडेखोरांशी तुलना करत भाजप हा कधीच मोठा पक्ष नव्हता. भाजपने दुसऱ्यांच्या खात्यावर दरोडा टाकल्याची टीका केली. रविवारी महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी उस्तुक होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :