अजित पवारांवरील टीकेने भुजबळ व्‍यथित; म्‍हणाले, “रक्‍ताची नाती….” | पुढारी

अजित पवारांवरील टीकेने भुजबळ व्‍यथित; म्‍हणाले, "रक्‍ताची नाती...."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अजित पवार यांच्‍या विरोधातील कुटुंबातील माणसं गेल्‍याचे दिसतं आहे. कोणीही मतभेदामुळे टीका करत असेल तर आपल्‍या भाषेवर नियंत्रण ठेवणे गरचेचे आहे. राजकारणात मतेभद असतात हे ठीक आहे; पण रक्‍ताची नाती कायम राहतात, असा सल्‍ला राष्‍ट्रवादीच्‍या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांविरोधात टीका करणार्‍या पवार कुटुंबातील सदस्‍यांना आज ( दि. १९ मार्च )  दिला.

उद्या  तुम्‍हाला एकमेकांची तोंड पाहायचे आहे…

माध्‍यमांशी बोलताना छगन भुजबळ म्‍हणाले की, राजकारणात मतभेद असतात. लोकशाहीमध्‍ये कोणी तरी कोणाच्‍या विरोधात निवडणुकीला उभा राहतोच. आज अजित पवार यांच्‍या विरोधातील कुटुंबातील माणसं गेल्‍याचे दिसतं आहे. राजकारणात मतभेद असतात हे ठीक आहे. पण रक्‍ताची नाती कायम राहतात. आज राजकारणातून तुम्‍ही टीका कराल; पण उद्या कोणत्‍या तरी कार्यक्रमानिमित्त असो की अन्‍य कारण तुम्‍हाला एकमेकांची तोंड पाहायचे आहे. रक्‍ताची नाती अशी तुटत नसतात. त्‍यामुळे अजित पवारांवर टीका करताना भाषेचा विचार करणे गरजेचे आहे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

आजही उद्धव आणि राज एकमेकांच्‍या मदतीला जातात

ठाकरे कुटुंबामध्‍ये राजकारणातून मतभेद झाले. उद्‍धव आणि राज ठाकरे हे वेगळे झाले. ते एकमेकांवर टीकाही करतात;पण आज कोणी अडचणीत असेल तर दोघेही एकमेकांच्‍या मतदीतला जातात. राजकारण आपल्‍या ठिकाणी असते. यामध्‍ये मतभेद असतात;पण यामुळे रक्‍ताची नाती तुटत नाहीत, असे भुजबळांनी सांगितले.

पक्ष काही फुटत नसतो

निवडणूक काळात तिकिट मिळण्‍यावरुन नाराजी व्‍यक्‍त होत असते. कोणी एका पक्षातून फुटून गेला तर त्‍याच्‍या जागी दुसरा येव असतो. त्‍यामुळे पक्ष वगैरे काही फुटत नसतो, असेही भुजबळ यांनी सांगितले. अलिकडे राजकारणात भाषेचा स्‍तर फार खालावला आहे. याबाबत निवडणूक आयोगानेच दखल घेणे आवश्‍यक आहे, असे त्‍यांनी माजी आमदार शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्‍या टीकेला उत्तर देताना सांगितले.

हेही वाचा :

 

Back to top button