LokSabha Elections 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्वाची बैठक | पुढारी

LokSabha Elections 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्वाची बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीला (LokSabha Elections 2024) अवघा महिना उरला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होणार आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) आज बैठक होणार असून, त्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा निश्चित केला जाणार आहे. तसेच उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक समितीचीही बैठक

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही आज बैठक होणार आहे. काँग्रेस मुख्यालयात सकाळी १० वाजता ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठकही होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections 2024) पक्षाच्या उर्वरित उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button