पुढारी ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी जेएसडब्ल्यू समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Chairman and MD of JSW Group Sajjan Jindal) यांच्याविरोधातील कथित बलात्कार प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान जिंदाल यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असे न्यायालयात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये पोलिसांनी नमूद केले आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
जेएसडब्ल्यू समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यावरील बलात्काराचा आरोप खोटा होता आणि तक्रारदाराने त्यांना यात अडकवण्याचा प्रयत्न केला, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तक्रारदाराने जिंदाल यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने दाखल केली होती. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की, ज्या दिवशी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असे महिलेने सांगितले होते; त्या दिवशी जिंदाल हॉटेलमध्ये गेले नव्हते. क्लोजर रिपोर्टनुसार पोलिसांनी हॉटेलमधील साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे.
मुंबईतील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बलात्कार प्रकरणी एफआयआर दाखल केले होते. तिच्या वकिलांनी न्यायालयात सादर केले होते की तिने फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथम बीकेसी पोलिसांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. २४ डिसेंबर २०२१ रोजी ही घटना घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते.
क्लोजर रिपोर्टमध्ये पोलिसांनी नमूद केले आहे की, या घटनेनंतर महिलेने तिची तक्रार नोंदवली. पण ती पुरावे सादर करु शकली नाही. पोलिसांनी वारंवार न्यायालयाला पत्र लिहूनही तक्रारदाराने तिचे म्हणणे नोंदवले नाही, असे पोलिसांनी सांगितले. तिने न्यायालयाचा वेळ वाया घालवला.
या प्रकरणी पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की, ज्यावेळी घटना घडली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर आणि तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांवरून " त्यांनी महिलेसोबत कोणतेही गैरवर्तन केलेले नाही", हे स्पष्ट होते.
हे ही वाचा :