केंद्राच्या आदेशाची वाट पाहू नका, कामाला लागा : मुख्यमंत्र्यानी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश | पुढारी

केंद्राच्या आदेशाची वाट पाहू नका, कामाला लागा : मुख्यमंत्र्यानी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

मुंबई, पुढारी ऑनलाईन :  ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधने पाळावी लागतील, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली. उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलविली आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे अनेक देशांत चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक घेतली.

ठाकरे यांनी कोविडच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. केद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. मुबंईसह राज्यातील सर्व विमानतळांवर कडेकेकोट बंदोबस्त ठेवा. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून गरज भासल्यास त्यांना क्वारंटाइन करा. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची सर्व बंधने पाळावीच लागतील, असे ते म्हणाले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी घेतली होती बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली होती. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.

 इमारत सील

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसे कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांग़ितले. व्हेन्टिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरता येईल यादृष्टीने ते सज्ज करुन ठेवण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहेत.

अशी आहे नियमावली

  • दुकाने, मॉल्समध्ये दोन डोसशिवाय प्रवेश केल्यास किंवा दिल्यास 10 हजार रुपये दंड.
  • टॅक्सी/खासगी वाहतूक, चारचाकी किंवा बसमध्ये दोन डोस न घेता आढळून आल्यास, त्याला 500 रुपये दंड ठोठावला जाईल. त्याचबरोबर चालक/क्‍लीनर/वाहकाला 500 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.
  • बसेसच्या बाबतीत, वाहतूक एजन्सीच्या मालकास 1,000 रुपये दंड आकारला जाईल.
  • सार्वजनिक किंवा सामाजिक मेळावा एखाद्या बंदिस्त ठिकाणी म्हणजे सिनेमा हॉल, थिएटर, विवाह हॉल, दीक्षांत सभागृहात होत असेल, तर जागेच्या क्षमतेच्या फक्‍त 50 टक्के परवानगी दिली जाईल.
  • एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के लोकांना खुल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
  • दोन डोस घेतले आहेत असेच लोक सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करू शकतील.ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तेच कोणत्याही दुकानात, व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये, मॉलमध्ये, कार्यक्रमात किंवा इतर सामाजिक मेळाव्यात जाऊ शकतात.
  • ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे तेच लोक कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. कोविन प्रमाणपत्र दाखवून सामाजिक मेळाव्यातही सहभागी होऊ शकतात.
  • दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचार्‍यांनाच कोणत्याही कार्यालयामध्ये किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रवेश.
  • 1,000 पेक्षा जास्त लोकांचा जमाव कुठेही जमल्यास त्याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात यावी.
  • कोरोना नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्‍तींना 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • कोणत्याही संस्थेने या नियमांचे पालन केले नाही, तर त्यांना 50 हजार रुपये दंड आकारला जाईल.
  • देशांतर्गत प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील किंवा 72 तासांचा वैध ठढ-झउठ नकारात्मक अहवाल असेल, तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल.

हेही वाचा : 

Back to top button