कामाच्या ताणामुळे IIT-IIM पदवीधर तरूणाने जीवन संपवले

कामाच्या ताणामुळे IIT-IIM पदवीधर तरूणाने जीवन संपवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयआयटी आणि आयआयएमसह प्रतिष्ठित संस्थांमधून पदव्या मिळवलेल्या २५ वर्षीय कर्मचाऱ्याने कंपनीतील कामाच्या ताणामुळे टोकाचे पाऊल उचलले. वडाळा येथील अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील बाल्कनीतून कर्मचाऱ्याने उडी मारून जीवन संपवले. २३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. सौरभ कुमार लड्डा असे त्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ याने आयआयटीमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि आयआयएममधून एमबीए केले होते. माटुंगा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तो नोकरी करत होता. अहमदाबादमध्ये कंपनीच्या एका प्रकल्पावर काम करण्यासाठी तो गेला होता. २३ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अहमदाबादहून परतल्यानंतर त्याने राहत असलेल्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. वॉचमनला तो जमिनीवर पडलेला दिसला, त्याने त्याच्या मित्रांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, कामाच्या ताणामुळे सौरभने हा निर्णय घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवण्यात आले असून, मृत्यूच्या आदल्या दिवसांत त्याची मानसिक स्थिती काय होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. तपास अधिकारी त्याच्या सहकाऱ्यांशी आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठांशीही संपर्क साधत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news