Maharashtra Politics : कोणालाही डावलून जागा वाटपाबाबत निर्णय नाही : शंभुराज देसाई | पुढारी

Maharashtra Politics : कोणालाही डावलून जागा वाटपाबाबत निर्णय नाही : शंभुराज देसाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमची महायुती आहे.  यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष आहेत. त्याचबरोबर  इतर  आठ-नऊ सहकारी पक्ष आहेत. महायुतीमधील समन्वयकांची बैठक असते तेव्हा सर्व पक्षातील लोकांना चर्चेला बोलवलं जाते. सर्वांशी  चर्चा करुन निर्णय घेतले जातात. कोणालाही डावलून जागा वाटपाबाबत निर्णय घेतले जाणार नाही. अंतिम निर्णय होईपर्यंत जागा वाटपाबाबत चर्चा होत असते, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी आज (दि.४) पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न 

धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात बोलताना ॲड. असीम सरोदे यांनी गुवाहाटी येथे वास्‍तव्‍यास असताना  शिंदे गटाच्‍या आमदारांच्‍या वर्तनाबाबत गंभीर आराेप केले. याबाबत शंभुराज देसाई म्हणाले, असीम सरोदी वकील आहेत ना? त्यांना आता कुठून  जाग आली.  तुम्ही दोन वर्ष कुठे होता. हे सर्व रचलेलं आहे. केवळ बदनामासाठी हे सुरु आहे. शिंदे सरकारकडून होत असलेली प्रगती त्यांना बघवत नाही. म्हणून हे असले आरोप केले जात असल्‍याचा दावाही त्‍यांनी केला.

कोणालाही डावलून जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार नाही

जागावाटपा संदर्भात बोलत असताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, “आमची १२ जागांची मागणी आहे. प्रत्येक पक्षात चर्चा होत असते. कोणाला कोणती आणि का जागा द्यायची, तशी चर्चा आमची अद्याप सुरु आहे. त्यामुळे जागा मागणं. त्या जागेसाठी आग्रही असणे आणि ती जागा आमच्यासाठी प्रभावी मागणी होत असते; पण जेव्हा आमचे वरिष्ठ निर्णय घेवून समाधानकारक निर्णय देतात. कोणालाही डावलून जागा वाटपाबाबत निर्णय घेतले जात नाहीत. अंतिम निर्णय होईपर्यंत जागा वाटपाबाबत चर्चा होत असते, असेही त्‍यांनी सांगितले.(Maharashtra Politics) महायुतीमधील समन्वयकांची बैठक असते तेव्हा सर्व पक्षातील लोकांना चर्चेला बोलवलं जाते. सर्वांशी  चर्चा करुन, विचारविनमय करुन निर्णय घेतले जातात. चर्चेमध्ये कोणालाही डावलले जात नाही. कोणाला विश्वासात घेतलं जाणार नाही असं होणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा 

Back to top button