Lok Sabha Election 2024: “आम्ही NDA सोबतच”; खासदार नवनीत राणांचा पवित्रा, हाती घेणार कमळ? | पुढारी

Lok Sabha Election 2024: "आम्ही NDA सोबतच"; खासदार नवनीत राणांचा पवित्रा, हाती घेणार कमळ?

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: आम्ही ‘एनडीए’सोबतच आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेईन; अशी स्पष्ट भूमिका खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. आम्ही NDA सोबत आहोत, त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही. नागपुरात उद्या नमो युवा संमेलन आहे. एनडीएचा घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, कोण काय बोलते? यावर मी बोलत नाही अशी भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत अमरावती रोडवरील रातुम विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भाजयुमोच्या नमो महासंमेलनात राणा येणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमरावतीत आनंदराव अडसूळ आणि राणा यांच्या तिकिटाचा संघर्ष जोरात आहे. शिंदेची शिवसेना की भाजपचे कमळ याचा फैसला लवकरच होणार आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोल्यात येत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि अमितभाई शहा यांच्या दौऱ्यानंतरच विदर्भ, राज्याती महायुतीचे तिकीट वाटपाचा तिढा सुटेल असे बोलले जात आहे.  खासदार राणा कमळ चिन्हावर लढणार का? हे पण लवकरच उघड होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

दरम्यान नवनीत राणा आज (दि.०३) माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, कोण राजकारण सोडेल हा विषय माझा नाही. अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनाही श्रीरामाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ, आनंदराव अडसूळ आम्हाला आशीर्वाद देतील असा विश्वास आहे. राजकारण सोडू, असे अनेक लोक बोलत आले. राजकारण असं आहे जिवंत असेपर्यंत कणाकणामध्ये आणि रगा रगामध्ये राजकारण भरलेले आहे. 80 वर्षाचं वय असतानाही आनंदराव अडसूळ यांना निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा आहे. जोपर्यंत आनंदराव अडसूळ हयातीत आहेत, तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाहीत. पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील यावर त्यांनी भर दिला. एकंदर अमरावतीचा मतसंग्राम जोरात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही वाचा:

Back to top button