Maharashtra Politics : ‘ईव्‍हीएम’चा घोटाळा करुन भाजप निवडणूक जिंकेल : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण जनतेसोबत आहोत. ईव्हीएम मशीनचा घोटाळा करुन भाजप लोकसभा निवडणूक जिंकले तर आश्चर्य वाटायला नको. जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वास निर्माण झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.३) केला. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरु केलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्त संवाद अभियानाच्या सांगता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Maharashtra Politics)

या वेळी उद्धव ठाकरे म्‍हणाले की, भाजपने शनिवारी (दि.२मार्च) लोकसभा निवडणुकीसाठीच्‍या उमेदवारांची पहिली दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत निष्ठावंत नितीन गडकरी ह्यांचं नाव नाही. मात्र ज्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केली त्या कृपाशंकर सिंह ह्यांचं नाव आहे. ही आजची भाजपा!  नितीन गडकरी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. असं म्हणतं त्‍यांनी निशाणा साधला.

उद्योगपती, शेतकरी, कामगारांमध्ये, असंतोष आहे. जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वास निर्माण झाला आहे. 'तोडा, फोडा, राज्य करा' हे जास्त काळ टिकणार नाही. जनतेचा रेट्या समोर कितीही मोठा हुकूमशहा असेल तर तो टिकत नाही.जशी स्टेशन्सची नाव बदलली, शहरांची नाव बदलली तसं आता 'जुमला'चं नामकरण 'गॅरंटी' असं झालेलं आहे. जर भाजप ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल. आपण जनतेच्या सोबत आहोत. EVM चा घोटाळा करुन भाजप लोकसभा निवडणूक जिंकले तर तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news