Sanjay Raut On Politics: मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालंय- खासदार संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut On Politics: मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालंय- खासदार संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क: छोटे मोठे गुंड मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षात बसलेत. गेल्या १० दिवसांपासून मी रोज एक फोटो ट्विट करत पोलखोल करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आसपास सगळे गुंडच आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालंय. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या. सरकारच्या झुंडशाहीला जनतेचं आव्हान देऊ, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला आहे. ते आज (दि.११) पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut On Politics)

आयुक्तांनी वागळे, सरोदे अन् चौधरींवर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड घ्यावी

पुढे राऊत म्हणाले, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी कधीच न घेण्यात आलेली परेड घेतली. पण परेडची नौटंकी असून ती बंद करावी, अशी टीका देखील राऊत यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांवर केली. वरिष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधितज्ज्ञ असीम सरोदे आणि पत्रकार पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ले झाले. हे हल्ले करणाऱ्या गुंडांची आयुक्तांनी परेड घ्यावी, नाहीतर ते भाजपचे भक्त अशी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली. तसेच त्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे देखील स्पष्ट केले. (Sanjay Raut On Politics)

राजकीय फायद्यासाठी पुरस्कार…

केंद्राकडून राजकीय फायदा पाहून भारतरत्न दिला जातो. कायदा असा आहे की एका वर्षात फक्त तीन लोकांनाच भारतरत्न दिला जाऊ शकतो. पण यावेळी पाच जणांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला जात आहे. हे सर्व राजकीय फायद्यासाठी केले जात आहे. चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न दिला जात आहे, कारण जयंत चौधरी यांनी त्यांच्या पक्षात जावे अशी त्यांची इच्छा आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.

स्वामीनाथन आयोग का लागू केला नाही?

केंद्र सरकारने एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न दिला. शेतकऱ्यांच्या हिताचा, शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणारा स्वामीनाथ आयोग का लागू केला नाही? असा सवाल केंद्र सरकारला खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज (दि.११) माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut On Politics)

हेही बोला:

 

Back to top button