‘निर्भय बनो’च्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध; ‘बालगंधर्व’समोर आंदोलन | पुढारी

‘निर्भय बनो’च्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध; ‘बालगंधर्व’समोर आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ’निर्भय बनो’चे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अ‍ॅड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने शनिवारी निषेध करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी, ’देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या’, ’मोदी सरकार चले जाव’, ’पुणेकरांनो, सावधान खतरे में है संविधान’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या आपल्या पुणे शहरात काल हुकूमशाहीची दहशत सर्वांनीच अनुभवली.

सत्तेत असलेल्या महायुतीच्या तीनही पक्षांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केला. सरकारी आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी व त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या गुंडांनी पुण्यात केलेला लोकशाहीचा खून सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला असल्याची टीका जगताप यांनी या वेळी केली.

पक्षाचे रवींद्र माळवदकर,

डॉ. शशिकांत कदम, उदय महाले, रूपाली शिंदे, भक्ती कुंभार यांसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याखेरीज, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने हल्ला करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून अटकेची मागणी राहुल डंबाळे यांनी केली.

हेही वाचा

Back to top button