राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह निकालानंतर सुनिल तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय’ | पुढारी

राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्ह निकालानंतर सुनिल तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष, चिन्ह निवडणूक आयोगाच्या निकालानंतर खासदार सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. हा निर्णय आमच्याय बाजूने लागला. पक्ष, चिन्ह आमच्या गटाकडे कायम ठेवल्याचा आम्हाला आनंद आहे. सत्याचा विजय! लोकशाहीचा विजय! अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

तटकरे यावेळी म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ नाव व ‘घड्याळ’ चिन्ह हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राखून ठेवल्याबद्दल निवडणूक आयोगाचे सुनिल तटकरे यांनी आभार मानतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांचे ट्वीट करत मनःपूर्वक अभिनंदन केले आहे असेही खासदार सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button