Maharashtra Politics : अखेर! प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल | पुढारी

Maharashtra Politics : अखेर! प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अखेर महाविकास आघाडीत दाखल झाल्याची माहिती महाविकास आघाडीने त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. (Maharashtra Politics) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत दाखल झाल्यानंतर अनेक चर्चांना पुर्णविराम मिळाला.

Maharashtra Politics :  अखेर चर्चांना पुर्णविराम मिळाला…

वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सोशळ मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीने त्यांच्या ‘X’ अकाउंटवर फोटो शेअर करत म्हटले आहे की, “अखेर! अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  महाविकास आघाडीत. वंचित बहुजन आघाडी हा आणखी एक सोबतीचा पक्ष आता शामील.” फोटोमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ठाकरे गटाचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड दिसत आहेत.

संजय राऊत यांनी मंगळवार (दि.३०) रोजी पोस्ट करत म्हटलं होत की, ” वंचित बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील. वंचितमुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.” या पोस्टसह त्यांनी याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं होतं.

या आघाडीची इंडिया आघाडी होवू नये

महाविकास आघाडीत दाखल झाल्यानंतर प्रथमच माध्यमांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “अनेक विषयांवर चर्चा अजुन बाकी आहे.  या आघाडीची इंडिया आघाडी होवू नये ही दक्षता घेतली जाणार”

हेही वाचा  

Back to top button