ED Summons To CM Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पाचव्यांदा ED समन्स धुडकावले

ED Summons To CM Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पाचव्यांदा ED समन्स धुडकावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचव्यांदा समन्स बजावले होते. केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आज ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आज देखील केजरीवाल ईडीसमोर हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज पाचव्यांदा ईडी चौकशीचे समन्स धुडकावले आहे. (ED Summons To CM Kejriwal)

ईडीकडून समन्स म्हणजे, केजरीवाल यांना अटकेचा प्रयत्न

गेल्या बुधवारी म्हणजे ३१ जानेवारीला ईडीने केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवत, चौकशीला आज हजर होण्यास सांगितले होते. परंतु आजच्या ईडी चौकशीला देखील केजरीवाल हजर राहिले नाहीत. यावर आम आदमी पार्टीने (आप) 'ईडीकडून वारंवार समन्स पाठवणे म्हणजे त्यांना अटक करण्याचा हा प्रयत्न' असल्याचे म्हटले आहे. (ED Summons To CM Kejriwal)

दिल्ली सरकार पाडणे हा त्यांचा उद्देश- 'आप'चा निशाणा

ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे देखील आम आदमी पक्षाने म्हटले आहे. तसेच सीएम केजरीवाल यांना अटक करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही वैध समन्सचे पालन करू. पीएम मोदींवर निशाणा साधत, केजरीवाल यांना अटक करून दिल्ली सरकार पाडणे हा त्यांचा उद्देश आहे. हे आम्ही कधीही होऊ देणार नाही, असे देखील आम आदमी पार्टीने म्हटले आहे. (ED Summons To CM Kejriwal)

'या-या'वेळी केजरीवाल यांनी समन्स वगळले

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी २०२३ मध्ये २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर तसेच यावर्षी २०२४ मध्ये ३ जानेवारी आणि १८ जानेवारीला ईडीचे समन्स वगळले. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने आज पुन्हा आपचे अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले. परंतु अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी पुन्हा एकदा ईडीला टाळले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news