माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या १४ प्रवक्त्यांची यादी जाहीर | पुढारी

माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या १४ प्रवक्त्यांची यादी जाहीर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादी काँग्रेसकडून माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या – 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपालीताई ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के -पाटील, सायली दळवी आदींचा समावेश आहे.

Back to top button