Manoj Jarange -Patil : अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; जरांगेंची मोठी घोषणा | पुढारी

Manoj Jarange -Patil : अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; जरांगेंची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आणि सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा आंदोलन सूरूच राहणार आहे. गावागावात नोंदी तपासण्यासाठी टीम तयार करणार असून पहिलं प्रमाणपत्र मिळालं की, विजयी सभा घेणार, अशी घोषणा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. रविवारी (दि.२८) अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी ते बोलत होते. Manoj Jarange- Patil

“मराठ्यांनी जागरूक रहावे. अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र रेकॉर्डबाबत विचारणा करा. सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. फक्त काढलेल्या अध्यादेशाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी आणि प्रमाणपत्रांचे वाटप व्हावे. पहिलं प्रमाणपत्र मिळालं की विजयी सभा घेऊ. अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.Manoj Jarange- Patil

 मुंबईत शांततेत आंदोलन केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानत आंदोलकांचे कौतुक त्यांनी केले. कायद्याला आणि विषयाला जेवढा विरोध होईल, तेवढा तो मोठा असतो. आरक्षण कायदा हा देखील मोठा विषय आहे. या कायद्याचे सर्वजण समर्थन करा. कायद्याला विरोध करणाऱ्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शांततेत उत्तर द्या.

मराठवाड्यात कुणबी नोंदी कमी आढळून आल्या आहेत. त्यामुळे सातारा संस्थांन आणि इतर गॅझेट घ्यायचे सरकारला सांगितले आहे. त्र्यंबकेश्वर व राक्षसभुवन देवस्थान नोंदी, देवी लस डाटा, खासरापत्र, टीसी रेकोर्ड यानुसार कुणबी नोंदी धारकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

शासनाने राज्यात आता तालुका पातळीवर समित्या नेमल्या आहेत. या समितीमध्ये तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडल अधिकारी यांच्यासह ७ सदस्य या समितीत असणार आहेत. तहसील कार्यालयात जाऊन रेकोर्ड तपासले का ?  याची चौकशी करा. नसेल तपासले तर तपासणी करायला लावा. न्या.शिंदे समिती मराठवाड्यात पुन्हा ताकदीने काम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ११ मराठा तरुणांनी जिल्हा व तालुका पातळीवर काम करा. लोकांच्या प्रमाणपत्र वाटपात येणाऱ्या अडचणी सोडवा.

Manoj Jarange- Patil बैठकीतील निर्णय

१) कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
२) आंतरवाली सराटीसह राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
३) या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार
४) सोमवारी (दि.२९) रायगडावर दर्शनाला जाणार

हेही वाचा : 

Back to top button