Maratha Reservation GR : शिवरायांची घेतलेली शपथ मी पूर्ण केली : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

Maratha Reservation GR : शिवरायांची घेतलेली शपथ मी पूर्ण केली : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation GR) देण्याची मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती पूर्ण करण्याच काम मी केलं आहे. दिलेला शब्द पाळण हीच माझ्या कामाची पद्धत आहे. मराठा समाजासाठी हा ऐतिहासीक क्षण आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आंदोलन मागे घेण्यात आले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नव्या अध्यादेशाची प्रत सुपूर्द केली. तसेच त्यांच्या हस्ते सरबत घेवून जरांगे यांनी उपोषण सोडले. यानंतर उपस्थित मराठा समाजला मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाने एकजूट कायम ठेवली. मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. मराठा समाजाने न्याय मागताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली, यासाठी मुख्यमंत्री म्हणून आभार मानतो. हा ऐतिहासिक क्षण आहे. मी मतांसाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. मराठा समाजामुळे अनेकांना मोठी पद मिळाली, पण न्याय देण्याची वेळ आली तेव्हा अनेकांनी माघार घेतली. पण आज आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देणाचं काम सरकारने केलं आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. (Maratha Reservation GR)

हेही वाचा : 

 

Back to top button