Cancer Chemotherapy Treatment : केमोथेरपीनंतर रुग्णांना होणार त्रास कमी करण्यात ‘टाटा’च्या डॉक्टरांना यश

Cancer Chemotherapy Treatment : केमोथेरपीनंतर रुग्णांना होणार त्रास कमी करण्यात ‘टाटा’च्या डॉक्टरांना यश

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : टाटा मेमोरिअल हॉस्पिटल कर्करोगाच्या रुग्णांवर चांगल्या उपचारांसाठी नेहमीच प्रयत्नशील असते. रुग्णालयातील डॉक्टरांना आणखी एक यश मिळाले आहे. केमोथेरपीनंतर उलट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या डोसचे प्रमाण कमी करण्यात हे यश मिळाले आहे. औषधाचा एक छोटासा डोस देखील चमत्कार करतो. हा लहान डोस केवळ उलट्या नियंत्रित करत नाही, तर केमोथेरपीनंतर तीन ते चार दिवस सुस्त असलेल्या रुग्णांना सक्रिय ठेवतो. Cancer Chemotherapy Treatment

केमोथेरपीनंतर रुग्ण अनेकदा उलट्या झाल्याची तक्रार करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टर 10 mg Olanzapine सोबत इतर तीन औषधे देतात. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या मेडिकल ऑन्कोलॉजीच्या प्रा. डॉ. ज्योती बाजपेयी यांनी सांगितले की, हे औषध घेतल्यावर उलट्यांवर नियंत्रण होते, परंतु त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे या औषधाच्या सेवनामुळे रुग्ण ३ ते ४ दिवस सुस्त राहतात. रुग्णांच्या दिनचर्येवर परिणाम होत होता. हे दुष्परिणाम कमी करण्यात डॉक्टरांना मोठे यश मिळाले आहे. या औषधाचा डोस १० मिलीग्रामने कमी करून हे यश मिळाले. हा यशस्वी अभ्यास १२ जानेवारीरोजी द लॅन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
डॉ. ज्योती यांनी सांगितले की, औषधाचा डोस कमी करण्यासाठी ही चाचणी तीन टप्प्यात करण्यात आली. ही चाचणी २६७ रुग्णांवर करण्यात आली. ही चाचणी १३ ते ७५ वर्षे वयोगटातील रूग्णांवर घेण्यात आली. ज्यांना ट्यूमरसाठी अँथ्रासाइक्लिन किंवा उच्च-डोस सिस्प्लेटिन-आधारित केमोथेरपी मिळत होती. रुग्णांची दोन गटात विभागणी करण्यात आली. Cancer Chemotherapy Treatment

डॉक्टरांच्या मते, या अभ्यासात एक खास गोष्ट म्हणजे या कमी डोसच्या औषधामुळे स्टिरॉइड्सचा डोसही कमी झाला. या लहान डोसमुळे स्टिरॉइडचा डोसही रुग्णांना त्याच दिवशी द्यावा लागला. मात्र, यावर आणखी अभ्यास करण्याची गरज असल्याचे अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या अभ्यासासाठी २६७ रुग्णांना दोन गटात विभागण्यात आले होते. हा अभ्यास ९ फेब्रुवारी 2021 ते ३० मे 2023 दरम्यान करण्यात आला आहे. या अभ्यासात ९४ टक्के महिला रुग्णांचा समावेश होता. अभ्यासात समाविष्ट असलेल्या रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण देखील स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण होते. १३२ रुग्णांना २.५ मिलीग्राम ओलान्झापाइनचा डोस देण्यात आला आणि १३५ रुग्णांना १० मिलीग्राम ओलान्झापाइनचा डोस देण्यात आला.

– डॉ. श्रीपाद बाणावली,  टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे शैक्षणिक डीन

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news