नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि नवी मुंबई जोडण्याची कल्पना गेल्या अनेक वर्षांपासून होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्वाकांक्षी सागरी सेतूचे लोकार्पण करीत आहेत. 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्याचे भूमिपूजन करण्यात आले. 2024 च्या निवडणुकीपूर्वी त्याचा शुभारंभ होत आहे. यामुळे मोठा विकास मुंबई नवी मुंबईत होईल. यासोबतच नवी मुंबईचे एअरपोर्टची सुरुवात याच वर्षात होईल. या विमानतळावर पहिले विमान याच वर्षातील नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत उतरेल, हा आमचा संकल्प आहे. Jyotiraditya Scindia
यासोबतच कोल्हापूर-पुणे एअरपोर्टच्या संदर्भात समीक्षा सुरू आहे. आज आढावा घेऊन उद्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला मी जाणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नागपुरातील एमआरओ लोकार्पण प्रसंगी माध्यमांशी बोलताना केले. Jyotiraditya Scindia
नागपूरला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्टची संकल्पना घेऊन केंद्र,राज्य सरकार काम करत आहे. गोवा, नवी मुंबई आणि मुंबई, दिल्ली आणि इतरही दहा शहरात एक नाही तर दोन विमानतळ बनवण्याचा आमचा संकल्प आहे असेही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि नागपूरमध्ये एव्हीएशन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. कार्गोचे क्षेत्र असो की प्रवासी सेवांचे विषय असो.नागपूर हे मराठा साम्राज्याचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. माझा भावनात्मक संबंध नागपूरशी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.
हेही वाचा