MHT CET Exam 2024 : एमएचटी सीईटी परीक्षेची १६ जानेवारीपासून नोंदणी | पुढारी

MHT CET Exam 2024 : एमएचटी सीईटी परीक्षेची १६ जानेवारीपासून नोंदणी

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षा १६ ते ३ एप्रिल दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी १६ जानेवारीपासून १ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सर्व सामाईक परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. MHT CET Exam 2024

यामधील एमएचटी-सीईटी परीक्षा १६ ते ३० एप्रिलमध्ये आहे. यंदा ही परीक्षा गतवर्षीच्या तुलनेत २२ दिवस आधी घेण्याचे नियोजन केले आहे. गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती. अशी एकूण ६ लाख ३६ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. MHT CET Exam 2024

बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, यासाठी नियोजन केले आहे. पीसीबी आणि पीसीएम ग्रुप नोंदणी १६ जनेवरीपासूनच होणार आहे. मात्र, परीक्षा दोन टप्प्यात वेगवेगळ्या तारखेला होणार आहे. पीसीबी ग्रुपची परीक्षा १६ ते २३ एप्रिल दरम्यान होणार आहे. तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २५ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button