‘बार्टी’चे आवाहन : जात प्रमाणपत्राची पडताळणी ऑन व ऑफलाईन पद्धतीने करा | पुढारी

'बार्टी'चे आवाहन : जात प्रमाणपत्राची पडताळणी ऑन व ऑफलाईन पद्धतीने करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत येत असलेल्या अडचणी लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ने म्हटले आहे. (बार्टीचे आवाहन)

कोरोना महामारीमुळे उशिरा प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची सर्वच प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावलेल आहे. अर्ज प्रक्रियेत अडचणी येत असल्याचीही तक्रार राज्यातील विद्यार्थी करत आहेत. सीईटी सेलकडेही विद्यार्थ्यांनी अर्ज मुदतवाढ करावी, अशी मागणी करत आहेत. (बार्टीचे आवाहन)

विविध जिल्हयातून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करावी या मागणीची दखल घेत बार्टीने सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्या करिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने, अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली आहे. (बार्टीचे आवाहन)

येत्या 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही सूचना दिल्याचे बार्टीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी दोन्ही पद्धतीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button