Petrol Price : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर | पुढारी

Petrol Price : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेल कंपन्यांनी देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज (दि. २) बदल केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. तर अनेक राज्यांमध्ये दरात वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.  Petrol Price

Petrol Price : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वाढले आहेत

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात 43 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पेट्रोल 106.64 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. तर डिझेलच्या दरात 42 पैशांनी वाढ होऊन तो 93.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, गोवा, छत्तीसगड, ओडिशा, केरळ, जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात

भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) या सरकारी तेल कंपन्यां इंधनाचे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर दर आधारित असतात. यापूर्वी दर पंधरवड्याला पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जात होते. पण जून 2017 पासून नवीन योजनेतर्गंत रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात.

हेही वाचा 

Back to top button