राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आल्याच्या वृत्ताला उद्धव ठाकरेंचा इन्कार

राम मंदिर
राम मंदिर

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्याकडे राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण आले नाही. राम मंदिर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे. अयोध्येत मी कधीही जाईन, दर्शन घेईन. हा राजकीय इव्हेंट होऊन नये इतकीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. (उद्धव ठाकरे)

संबंधित बातम्या –

ते म्हणाले, शिवसेनेनं पक्षनिधीतून मंदिरासाठी योगदान दिलं. फडणवीस वकील आहेत, त्यांनी लखनऊ केस पाहावी. फडणवीसांनी स्वत:च ढोंगाचा बुरखा समोर आणला. लाखो करोंडोंच्या लोकांनी मंदिरासाठी योगदान दिलंय. निमंत्रण येऊ दे, त्यात राजकारणाचा भाग नाही. सगळ मीच केलं असा आव आणू नये. अडवाणींनी रथयात्रा काढली म्हणून मंदिर होतंय.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुका ३० एप्रिलपर्यंत लागू शकतात. काँग्रेसशी जागा वाटपाची चर्चा दिल्लीत होईल. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत बैठक होईल. त्यांच्याकडून विरोध नाही. माझ्याकडून आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. काँग्रेसकडून अद्याप कुठलाही फॉर्म्युला आलेला नाही. त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल. वंचितसोबत चर्चा सुरु आहे. एक-दोन दिवसांत निर्णय होईल.

ठाकरे म्हणाले, जागावाटप आमच्या महाविकास आघाडीमध्ये सुरळीत होईल. ह्याबाबतीत आमची बैठक होईल. मी आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी जोपर्यंत आम्ही बोलत नाही, तोपर्यंत आमच्यापैकी कुणीही ह्यावर काही बोलणार नाही. वंचितसोबत आमची बोलणी सुरु आहे. मविआ आणि वंचित अशी संयुक्त बैठक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देश वाचला पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. ह्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. कोणी कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी फरक पडत नाही.

मुंबईत गेल्या दिड वर्षात जी भ्रष्टाचाराची घाण झालीय, ती साफ करावीच लागेल. त्याउलट शिवसेनेनं ५०० फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द गेला तो एक भाग आणि आता महापालिकेकडून १५ ते ४० टक्के अधिक अधिभाराने मालमत्ताकर वसुल केला जातोय, ही सगळी घाण आहे ती मुंबईकरांना साफ करावी लागेल, असे ठाकरे यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news