Ajit Pawar on Amol Kolhe : अजित पवारांचे खा. डाॅ. अमाेल काेल्‍हेंना खुले आव्‍हान, “शिरूर मतदारसंघात…” | पुढारी

Ajit Pawar on Amol Kolhe : अजित पवारांचे खा. डाॅ. अमाेल काेल्‍हेंना खुले आव्‍हान, "शिरूर मतदारसंघात..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिरूर लाेकसभा मतदारसंघाबाबत उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.२५) माध्‍यमांशी बाेलताना  माेठे विधान केले. यावेळी त्‍यांनी राष्‍ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार अमाेल काेल्‍हे यांना आव्‍हान देत यांच्‍यावर सडकून टीकाही केली. तसेच आम्ही ३ पक्ष मिळून पुढील निवडणूका लढणार असल्याचे अजित पवार  म्हणाले. ( Ajit Pawar on Amol Kolhe)

‘त्या’ खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं

अजित पवार म्‍हणाले की, “शिरुर मतदारसंघातील विद्यमान खासदाराने पाच वर्ष त्याच्या मतदार संघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते. शरद पवार गटातील तो खासदार गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता. मला राजीनामा द्यायचा आहे, असे त्‍याने सांगितले हाेते. त्या खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जीवाचं रान केलं हाेते. त्यामुळे आता त्या खासदाराने आम्हाला शिकवू नये.” (Ajit Pawar on Amol Kolhe)

शिरूर मतदार संघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच

आगामी लाेकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्‍यक्‍त करत अजित पवार यांनी यावेळी कोल्हे यांच्या अभिनयाचे कौतुक देखील केले.  ( Ajit Pawar on Amol Kolhe)

काय म्‍हणाले हाेते खासदार अमाेल काेल्‍हे ?

एका मुलाखत कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. तुमच्यासाठी पवार साहेबांनी काय नाही केलं, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. ईडी, सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली होती. यावरून आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना खुले शिरूर मतदार संघात खासदार अमोल कोल्हे यांना खुले आव्हान दिले आहे. ( Ajit Pawar on Amol Kolhe)

हेही वाचा:

Back to top button