पोतडीत खूप दडलंय, काढायला गेलो तर खूप निघेल : शिंदेंचा विरोधकांना इशारा | पुढारी

पोतडीत खूप दडलंय, काढायला गेलो तर खूप निघेल : शिंदेंचा विरोधकांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : या पोतडीत खूप काही दडलंय, काढायला गेलो तर खूप निघेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना विरोधकांनी गदारोळ सुरु केला. यावेळी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा वजा टोला मारला. विरोधक रस्त्यावर, विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदलन करत टीका करताना दिसतात. त्या तुलनेत मी इतरांसारखी संस्कृती सोडलेली नाही. मी काही बोललेलो नाही. महाराष्ट्राची संस्कृती जपलीय. मला बोलायला भाग पाडू नका. या पोतडीत खूप दडलंय, काढायला गेलो तर खूप निघेल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. विधानसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

संबंधित बातम्या –

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. दिशा प्रकरणामुळे विरोधकांना दिशा मिळाली नाही. महायुती सरकारच्या काळात अनेक योजना सुरु केल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काम करेन. विरोधकांचे अवधान गळल्यासारखं आहे. सरकार आल्यामुळे अनेक प्रकल्प सुरु केले. आरक्षणाच्या प्रश्नांवरून विरोधकांनी राजकारण केलं. राज्याला नंबर १ आणण्याचं काम सरकारने केलं आहे. या पोतडीत खूप काही दडलंय काढायला गेलो तर खूप निघेल. मी महाराष्ट्राची संस्कृती जपलीय. चांगल्याला चांगलं म्हणणं ही, महाराष्ट्राची संस्कृती आहे.

मविआ काळात शालेय शिक्षणाचा स्तर खालावला. आता शिक्षणाचा कायापालट होणार. डिजीटल शिक्षण पद्धती आणण्याच्या नादात मागे गेलो. पण डिजिटल शिक्षण व्यवस्थेने राज्याचा कायापालट होणार. राज्यातील शिक्षण व्यवस्था आता सुधरवणार, असेही ते म्हणाले.

ठाण्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलं. बांधकामांना परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करणार. यावेळी शिंदेंनी कोविड काळातील सर्व घोटाळ्यांचा पाढा वाचला. ते म्हणाले, कोविड काळात काय घोटाळा झाला, याची माहिती आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार. रस्ते बनवणाऱ्या कंपनीने ऑक्सिजन प्लँट उभारला. त्यामध्येही घोटाळा झाला. काहींच्या कृपेनं टेंडरचा पाऊस पडला. कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदेदेखील कमी पडतील, असे त्यांनी नमूद केले.

कोविड काळात गोरगरिबांना ३०० ग्रॅम खिचडी देण्याऐवजी १०० ग्रॅम खिचडी वाटण्यात आली. २०० ग्रॅम खिचडीचा आर्थिक घोटाळा करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी ठाकरेंचं नाव घेता टीका केली. शिंदे म्हणाले, पालिकेवर दरोडा टाकण्याचं काम केलं. घरी बसून एख नंबर मुख्यमंत्री कसा? जिथे टेंजर तिथे सरेंडर अशी त्यांची वृत्ती. टेंडरसाठी पार्शियन दरबारचा पत्ता दिला. पैशासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला. रोमिल छेडाला ५७ कामे देण्यात आली. रेमडिसिव्हिरचं कंत्राटही आपल्या मित्राला दिलं. धारावीचा प्रकल्प रखडवण्याचा डाव आखला. निविदा प्रक्रिया का रद्द केली, असा सवालही त्यांनी केला. अदानी कंपनीला टेंडर देण्याची प्रक्रिया पारदर्शक असल्याचे शिंदे म्हणाले.

Back to top button