

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : येत्या 22 जानेवारीला श्रीरामलल्लाच्या मूर्तीची अयोध्येतील नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अक्षता स्वरूपात या मंगल कलशाचे श्रीक्षेत्र जेजुरी येथील श्रीखंडोबा मंदिरात पूजन करण्यात आले. या वेळी मार्तंड देवसंस्थान
जेजुरीचे विश्वस्त मंगेश घोणे, अॅड. पांडुरंग थोरवे, श्रीरामजन्मभूमी अभियानाचे पुरंदर तालुकाप्रमुख किरण बारभाई , मंडल प्रमुख वैभव लांघी, जय मल्हारचंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, श्रेयस बारभाई, सुमित गुरव, विजय घोणे उपस्थित होते.
जेजुरी गावातून लवकरच कलश यात्रा निघणार आहे. गावातील सर्व श्रीरामभक्तांना या मंगल अक्षता कलशाचे पूजन करण्याचा अमृत योग लाभणार आहे. सर्वांनी या कलश यात्रेत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, पुरंदरतर्फे करण्यात आले आहे.