Vidhan Bhavan Fake Entry Pass: बनावट पत्रावर अधिवेशनाचे पास; 7 अटकेत

मंत्रालय आणि विधिमंडळ कर्मचाऱ्यांचे एमआयडीसीच्या नावाने उद्योग
Vidhan Bhavan
Vidhan Bhavan Pudhari
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बनावट लेटरहेडद्वारे प्रवेश पास वितरीत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सात जणांवर अटकेची कारवाई केली आहे. यात विधिमंडळ सचिवालयातील चार, मंत्रालयातील दोन अशा सहा सरकारी कर्मचाऱ्यांसह एका बाहेरील व्यक्तीचा समावेश आहे.

अधिवेशन काळात विधिमंडळातील प्रवेश पासचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वारेमाप पास वाटल्याने कामकाज करणेच मुश्कील झाल्याची तक्रार वाढल्यानंतर प्रवेश पास वितरणावर निर्बंध घालण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट पास बनविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Vidhan Bhavan
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलची बस उलटली; दोन ठार

काही व्यक्तींकडे बनावट प्रवेशिका आढळल्याने संशय बळावला होता. विधान परिषदेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची कबुली देत, महामंडळाच्या बनावट लेटरहेडवर विभागातील अधिकाऱ्यांची नावे आणि पदे नमूद करून अनधिकृतपणे पासेस वाटण्यात आल्याचे सभागृहात सांगितले होते.

विधान भवन सुरक्षा विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत, मंत्रालयातील आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांनीच संगनमताने हा बनावट पासेसचा बाजार मांडल्याचे निष्पन्न झाले. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. यामध्ये दत्तात्रय गुंजाळ या बाहेरच्या व्यक्तीसह सहा शासकीय कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Vidhan Bhavan
BMC Tenders Cancelled: प्रशासकीय राजवटीतील 1 हजार कोटींच्या निविदा रद्द

सरकारी नियमानुसार एखादा कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत असल्यास त्याला तत्काळ निलंबित केले जाते. या निकषानुसार या कर्मचाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विधिमंडळ सचिवालयातील मनोज मोरबाळे, महेश दुम्पलवार, स्वप्नील तायडे, लवेश नाकडे यांचा, तर मंत्रालयातील गणपत जावळे, नागेश पाटील या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news