Maratha Reservation : मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रेला हायकोर्टाकडून जामीन | पुढारी

Maratha Reservation : मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रेला हायकोर्टाकडून जामीन

मुंबई पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी गोंदी पोलीस स्टेशन येथे 307 कलमासह इतर गुन्ह्यात ऋषिकेश बेद्रे यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ॲड. विशाल कदम यांच्या मार्फत हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील प्रकरणी आज न्या. एस. व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठ समोर वरिष्ठ विधीज्ञ व्हीं. डी. सपकाळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने जामीन दिला आहे. यामुळे मराठा समाजासह सर्व आंदोलन कर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Maratha Reservation)

Maratha Reservation : ऋषिकेश बेद्रेला हायकोर्टाकडून जामीन

सविस्तर वृत्त असे की, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची तब्येत घालवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असताना जालना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठी चार्ज करत अश्रू धुराचा देखील प्रयोग केला. सदरील घटनेमध्ये अनेक आंदोलकांसह पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. ऋषिकेश बेद्रे यांना सदरील प्रकरणी मुख्य आरोपी करण्यात आले आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते तसेच सदरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केले होते. असे असताना सदरील गुह्यात ऋषिकेश बेद्रे यांना अटक करून त्यांच्याकडे गावठी कट्टा व काडतुसे सापडल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. विधानसभेत यावर गदारोळ देखील झाला. अंबड सत्र न्यायालयाने अर्ज भेटल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ॲड विशाल कदम यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जावर आज दिनांक 14/12/2023 न्या. एस. व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ विधीज्ञ व्हि. डी सपकाळ यांनी युक्तिवाद केला. सदरील युक्तिवाद गृहीत धरून अटी शर्तींच्या आधारावर सदरील जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. मराठा समाजासह सर्व आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा 

 

Back to top button