Kolhapur Leopard Attack : बिबट्याची झाडावरून उडी अन् शेतकऱ्याचा उडाला थरकाप; वंदूर येथील घटना | पुढारी

Kolhapur Leopard Attack : बिबट्याची झाडावरून उडी अन् शेतकऱ्याचा उडाला थरकाप; वंदूर येथील घटना

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील वंदूर येथे बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास शेतकरी शिवाजी मल्लू पाटील हे गवत कापण्यासाठी गेले असता झाडावर चढून बसलेला बिबट्या त्यांनी पाहिला. बिबट्याने खाली उडी मारताच शिवाजी पाटील या शेतकऱ्याचा थरकाप उडाला.

बिबट्याने भुकणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर कुत्र्याला पकडून ऊसात धूम ठोकली. यानंतर शेतकरी आरडाओरडा करत पळत सुटले. ही घटना समजतात गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. वन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. बिबट्या आल्याचे समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. दोन कुत्री खाल्ल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये यासाठी गावात दवंडी देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button