Jayant Patil On Ajit Pawar : घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

Jayant Patil On Ajit Pawar : घरातील गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही: जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला
Published on
Updated on

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबातील काही गोष्टींची चर्चा बाहेर करायची नसते. अशा गोष्टी कुटुंबातच ठेवायच्या असतात. त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (दि.१) दिंडोरीतून रणशिंग फुंकले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. Jayant Patil On Ajit Pawar

कर्जत येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षांतर्गंत चर्चांबाबत अजित पवार यांनी काही गौप्यस्फोट केले. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. Jayant Patil On Ajit Pawar

पाटील म्हणाले की, राज्यातील सरकारमध्ये एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री वेगळे बोलतात. तर त्यांचे मंत्री वेगळेच बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मराठा- ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायांविरुद्ध उभे रहा. अन्याय झालेल्याच्या पाठिशी उभे रहा, अशी शिकवण दिली आहे. काहीजण सत्तेत गेले आणि ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेत आहेत. तर आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत आहोत. आर्थिक तिजोरी तुमच्याकडे, कृषिमंत्री पद तुमच्याकडे मग शेतकऱ्यांसाठी तिजोरी मोकळी का करत नाही,असा सवाल पाटील यांनी यावेळी केला.

Jayant Patil On Ajit Pawar  नरहरी झिरवाळ यांच्याबाबत चुप्पी

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरीत काय रणनीती आखणार, झिरवाळ यांच्याबाबत काय वक्तव्य करणार याची उत्कंठा होती. मात्र, जयंत पाटील यांनी झिरवाळ यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य न करता केवळ केंद्र व राज्य शासनाच्या कारभारावर टीका केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news