GramPanchayat Election : ३० दिवसांत खर्चाचा हिशेब द्या; नाही तर अपात्र व्हाल! ग्रा.पं. उमेदवारांना निवडणूक आयोगाची तंबी | पुढारी

GramPanchayat Election : ३० दिवसांत खर्चाचा हिशेब द्या; नाही तर अपात्र व्हाल! ग्रा.पं. उमेदवारांना निवडणूक आयोगाची तंबी

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी निवडणूक निकाल लागल्यापासून तीस दिवसांच्या आत टू व्होटर अॅपद्वारे निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

राज्यातील दोन हजार ३५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच थेट सरपंचपदाच्या १३० रिक्त जागा व २ हजार ९५० सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकांचा निकाल ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांना ६ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button