जीवावर बेतले, पण वाचविला जीव; फुफ्फुसे बोलली, अरे हाच खरा शिव! फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी | पुढारी

जीवावर बेतले, पण वाचविला जीव; फुफ्फुसे बोलली, अरे हाच खरा शिव! फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी

चेन्नई/पुणे/मुंबई : चेन्नईत दाखल एका रुग्णासाठी डॉक्टर फुफ्फुसे घेऊन निघालेले होते. वाटेत पुण्यात अ‍ॅम्ब्युलन्सला अपघात झाला. या अपघातात डॉक्टर जखमी झाले. पण वेळेत चेन्नईला पोहोचलो नाही तर तेथे त्या रुग्णाचे काही बरेवाईट होईल, म्हणून स्वत:च्या जखमांची पर्वा न करता डॉक्टरांनी चेन्नई गाठले आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली.

तत्पूर्वी चेन्नईमध्ये दाखल रुग्ण सलग 72 दिवस लाईफ सपोर्टवर होता. फुफ्फुसाचा कर्करोग त्याला होता. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आता धोक्याबाहेर असून त्याच्या प्रकृतीतही वेगाने सुधारणा होत आहे. डॉ. संजीव जाधव हे मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आहेत. ब्रेन डेड असलेल्या 19 वर्षांच्या मुलाचे फुफ्फुस काढण्यासाठी ते पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयात आले. रुग्णवाहिकेमागे डी. वाय. पाटील रुग्णालयाची कार होती.

डॉ. जाधव आपल्या स्टाफसह होते. विमानतळाकडे ते निघालेले होते. अचानक रुग्णवाहिका एका पिकअप व्हॅनला धडकली. नंतर एमएसआरटीसीच्या बसला व पुढे हॅरिस पुलाच्या भिंतीवर आदळली. अपघातानंतर डॉ. संजीव हे कसेबसे विमानतळावर पोहोचले आणि चार्टर प्लेनमध्ये बसून चेन्नईला रवाना झाले. वेळेवर फुफ्फुसे पोहोचविली आणि वेळेत प्रत्यारोपणही केले.

हेही वाचा

Pune News : प्रदूषण तपासणीसाठी 15 पथकांची स्थापना

Pune News : उरुळी देवाची, फुरसुंगी नगरपरिषदेचा मार्ग मोकळा

काँग्रेसच्या कुटुंबाबद्दल बोलतो, तो संपूनच जातो : पंतप्रधान मोदी

Back to top button