NCB Mumbai: एनसीबीकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, १५ कोटींच्या कोकेनसह दिल्ली-मुंबईतून परदेशातील दोघांना अटक | पुढारी

NCB Mumbai: एनसीबीकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, १५ कोटींच्या कोकेनसह दिल्ली-मुंबईतून परदेशातील दोघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत मुंबईतील एका हॉटेलमधून सुमारे १५ कोटींचे २ किलो कोकेन जप्त केले आहे. याशिवाय झांबियाच्या नागरिकासह टांझानियन महिलेला अटक करण्यात आली आहे, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. (NCB Mumbai)

पीटीआयने एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, जप्त केलेल्या दोन किलो कोकेनची किंमत १५ कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या मुंबई टीमने हॉटेलवर छापा टाकून झांबियाच्या नागरिकाला अटक केली. आरोपी झांबियातील लुसाका येथून इथिओपियाच्या राजधानीत ड्रग्ज घेऊन गेला होता. यानंतर तो मुंबईत आला. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (NCB Mumbai)

चौकशीदरम्यान आरोपीने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तस्करीची महत्त्वाची माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की त्याला एका हँडलरकडून सूचना मिळत होत्या, त्यानंतर त्याच्या हँडलरबद्दल माहिती गोळा करण्यात आली. यानंतर एनसीबीच्या पथकाने दिल्ली गाठून टांझानियन महिलेला अटक केली.

NCB Mumbai : दिल्लीतून टांझानियन महिलेला अटक

अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतून अटक करण्यात आलेली महिला झांबियन नागरिकाकडून कोकेनची खेप गोळा करणार होती, परंतु त्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली. तपासादरम्यान या सिंडिकेटचे आंतरराष्ट्रीय नेटवर्कही उघड झाले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे नेटवर्क मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि गोव्यासह अनेक शहरांमध्ये पसरलेले आहे.

हेही वाचा 

Back to top button