Eknath Khadse Health : प्रसंग कोणताही असो…एकनाथ खडसेंची थेट हॉस्पिटलमधून पोस्ट | पुढारी

Eknath Khadse Health : प्रसंग कोणताही असो...एकनाथ खडसेंची थेट हॉस्पिटलमधून पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,” “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.” प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. (Eknath Khadse Health)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथराव खडसे यांना रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता हे आरोग्य तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर जळगावमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी एअर अ‍ॅम्बुलन्सने मुंबईत हलविण्यात आले. (Eknath Khadse Health)

Eknath Khadse Health : मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते…

एकनाथराव खडसे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !”

हेही वाचा

Back to top button