Eknath Shinde: लोकसभा, विधानसभा महायुती म्हणून लढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

Eknath Shinde: लोकसभा, विधानसभा महायुती म्हणून लढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा / बामणोली; पुढारी वृत्तसेवा: भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अशा आमच्या महायुतीची बैठक झाली आहे. यामध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असून, या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. राज्य सरकारच्या कामकाजाचे मोजमाप लोक नक्की करतील. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जनता विरोधकांना सडेतोड उत्तर देईल. लोकसभेला राज्यात महायुतीच्या ४५ जागा आल्याशिवाय राहणार नाहीत’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दरे (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी (दि. ४) आगमन झाले. (Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांना काही कामधंदा राहिला आहे का? रोज आरोप करणे हेच काम विरोधकांना राहिले आहे. मात्र, आम्ही कामातून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत आहोत. त्यांनी इगो ठेवून बंद केलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. असे राज्यकर्ते नसतात, अहंकारी वृत्ती ठेवून राज्य चालत नाही. विरोधकांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नसून, आमचे आम्ही काम करत आहोत. आम्ही सकाळी उठल्यापासून विकासाचे प्रकल्प पुढे नेत आहोत. हे आपण सर्व जण पाहत आहात. जे कोणी बोलत आहेत, त्यांच्यावर मला काही बोलायचे नाही. (Eknath Shinde)

हेही वाचा:

Back to top button