१ डिसेंबरपासून साखळी उपोषण; जरांगेंना उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटणार | पुढारी

१ डिसेंबरपासून साखळी उपोषण; जरांगेंना उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात पुन्हा गावागावात साखळी उपोषण सुरू करायचे आहे. १ डिसेंबर पर्यंत शेतीची कामे आटोपून घ्या; त्यानंतर प्रत्येक गावात मराठा बांधवानी साखळी उपोषण करायचे आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. २४ डिसेंबरला खांद्याला खांदा लावून लढायचं आहे, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केली.

आज (दि.५) माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगितले. मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. शांततेत आमचं आंदोलन सुरू राहणार. आरक्षणासाठी कोणीही टोकाचा निर्णय घेवू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. २४ डिसेंबरपर्यंत प्रत्येक घरातील मराठा जागृत ठेवायचा आहे, यासाठी येत्या दोन दिवसात महाराष्ट्र दौरा करणार आहे. आता माझी तब्येत ठणठणीत आहे, कुणी काळजी करू नका. आमच्या हक्काच आरक्षण आम्हाला मिळवायचं आहे. सरकारचं शिष्टमंडळ उद्या मला भेटणार आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button