Maratha Reservation update | मराठा आरक्षण दडपण्याचा सरकारचा डाव; जरांगे-पाटील यांचा आरोप | पुढारी

Maratha Reservation update | मराठा आरक्षण दडपण्याचा सरकारचा डाव; जरांगे-पाटील यांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण दडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान, आज सह्याद्री अतिथीगृहावर सुरू असलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी सर्वपक्षीय आमदारांकडे केली. (Maratha Reservation update)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. दरम्यान, शिंदे समितीच्या अहवालावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी जरांगे पाटील यांना हाताळण्यात सरकार कमी पडले असून, मराठा आरक्षणासाठी केंद्राचा हस्तक्षेप आवश्यक आहे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली. तसेच मराठा आणि कुणबी एकच आरक्षण जाहीर करावं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. (Maratha Reservation update)

केंद्र, राज्याने एकत्रित आरक्षणावर तोडगा काढावा असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. तर राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचेदेखील सर्वपक्षीय आमदारांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला सर्वपक्षीय मंत्री, आमदार, नेते उपस्थित होते. शरद पवार, नाना पटोले, जयंत पाटीलदेखील बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे. आधीच्या चुका सुधारून मराठा आरक्षण देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वपक्षी नेत्यांनी मराठा जनतेला शांततेचं आवाहन करावं, असे यांनी यावेळी केले आहे. (Maratha Reservation update)

बैठकीनंतर मंत्रालयाबाहेर सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maratha Reservation update)

हेही वाचा:

 

Back to top button