Maratha Reservation Protest : मराठा उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली | पुढारी

Maratha Reservation Protest : मराठा उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चिंचणी (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब चौधरी यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी सुरू असून, त्यांची प्रकृती ढासळत आहे, त्याचबरोबर दोन दिवसांपासून आम आदमी पार्टीचे सावळेराम आवारी हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शिरूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात हे उपोषण दि. 26 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज उपस्थित होता. चिंचणी येथील भाऊसाहेब चौधरी हे उपोषणाला बसले आहेत. त्यांना माजी सैनिकांनीसुध्दा पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button