पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आंदोलनात सहभाग | पुढारी

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आंदोलनात सहभाग

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

स्वारगेट जवळ असणाऱ्या एसटी कॉलनीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनात सहभाग घेतला. आज (शुक्रवार) सकाळी एकत्र जमून त्यांनी थाळीनाद आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

अत्यंत तुटपुंज्या पगारात काम करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एसटी कॉलनीत राहणाऱ्या कुटुंबियांनी एकत्र जमून थाळीनाद केला. यावेळी महिलावर्ग, लहान मुले यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

तसेच शासन एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही ना काही करून चिरडू पाहत आहे, याचे आम्हाला खूप दुःख होत आहे, अशा भावना ही यावेळी कुटुंबियांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर शासनाने एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य करावी. अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

Back to top button