brain stroke : महिन्याला २५ मुंबईकर तरुणांना ‘ब्रेन स्ट्रोक’!

brain stroke : महिन्याला २५ मुंबईकर तरुणांना ‘ब्रेन स्ट्रोक’!
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत ब्रेन स्ट्रोक (brain stroke) चा धोका वाढत असून पूर्वी केवळ वृद्धांमध्ये आढळणाऱ्या या आजाराचा आता तरुणाई शिकार ठरत आहे. मुंबईत दर महिन्याला २० ते २५ तरुणांचा ब्रेन स्ट्रोकने बळी जात असून तणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना धोका निर्माण होत आहे.

संबंधित बातम्या : 

तरूणाईमध्ये कामाच्या तणावासह कौटुंबिक तणावही वाढत आहे. याचबरोबर बदलती लाईफस्टाईल, धूम्रपान, मद्यपान आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढत आहे. स्ट्रोकचा केवळ मेंदूवरच परिणाम होत नसून इतरही अवयवांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. गेल्या एका वर्षात ३० ते ४० वर्षांखालील तरूण स्ट्रोकचे बळी ठरले आहेत. दर महिन्याला सुमारे २० ते २५ रुग्णांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते, तर ५ ते ७ जणांवर थ्रोम्बोलिसिस आणि २ ते ३ जणांना यांत्रिक थ्रोम्बेक्टॉमी पध्दतीने उपचार केले जातात. स्ट्रोक आल्यानंतर सुमारे अर्धातास ते पन्नास मिनिटांमध्ये रुग्णालयात आवश्यक उपचार घेणे गरजेचे असते. या कालावधीत रुग्णांना वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक असते. (brain stroke)

"ही एक गुंतागुंतीची आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे आज अनेक लोक त्रस्त आहेत. तरुणाईमध्ये पक्षाघाताचे मुख्य कारण तणाव असून तरुण करिअरबाबत नेहमीच तणावाखाली असतात. याचबरोबर बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढत आहे. "
– डॉ. पवन पै, न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news