मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात मान्सूननंतरच्या पहिल्या चक्रीवादळाची चिन्हे दिसत असल्याने मुंबईत वीकेंडला (21 ऑक्टोबर) मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
लक्षद्वीप क्षेत्रावर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर आणि केरळच्या किनारपट्टीवरील चक्रीवादळ आता आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप क्षेत्रावर कमी उष्णकटिबंधीय पातळीत आहे. तसेच समुद्रसपाटीपासून सरासरी 3.1 किमीपर्यंत पसरले आहेत.त्याच्या प्रभावाखाली, पुढील 48 तासांत आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते आणखी पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची आणि 21 ऑक्टोबरच्या सुमारास मध्य अरबी समुद्रावर तीव्र दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या अधिकार्यांनी पुढे सांगितले.
हवामानशास्त्रज्ञांना आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप प्रदेशात चक्रीवादळाची पहिली चिन्हे दिसून आली आहेत. मात्र, चक्रीवादळाच्या तीव्रतेबद्दल त्यांना ठोस माहिती मिळालेली नाही..ही प्रणाली चक्रीवादळात तीव्र होण्याची फारशी शक्यता नाही. आमच्या मॉडेल्सने अद्याप तशी पुष्टी केलेली नाही. त्यामुळे चक्रीवादळाबाबत खात्रीलायक माहितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे आयएमडीच्या अधिकार्याने सांगितले.
संबंधित बातम्या
अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा इतिहास अनिश्चित ट्रॅक आणि टाइमलाइनचा आहे. हवामानशास्त्रज्ञांना अनेकदा त्यांच्या पुढील हालचालींचा निर्णायक अंदाज लावणे कठीण जाते. चक्रीवादळे ही अरबी समुद्राच्या मध्यभागी गेल्यावर सोमालिया, एडनचे आखात, येमेन आणि ओमान असा पसंतीचा मार्ग निवडतात. तथापि, काही प्रसंगी, ही चक्रीवादळे वळसा घेत गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीच्या दिशेने जातात, असेस्कायमेट वेदरने म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईला जास्त पाऊस पडणार नाही, अशी पोस्ट मुंबई रेन्सने केली आहे. सध्या मुंबईत स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. आमच्या ताज्या अंदाजानुसार कमी-दाबाचे क्षेत्र (एलपीए) लवकरच मोठ्या चक्रीवादळात रुपांतरित होउ शकते. मात्र, नागरिकांनी घाबरू नये. चक्रीवादळ आपल्या किनार्यापासून दूर जात आहे. चक्रीवादळाची टाइमलाइन पाहता सुरुवातीपासूनच भारताच्या दिशेने निघाले असते तर चिंतेची बाब ठरली असती, असे त्यांनी आहे.
संभाव्य चक्रीवादळामुळे मुंबईत फारसा पाऊस पडणार नाही, तथापि, रात्रीचे तापमान थंड राहील. ते 22-23 अंश सेल्सिअसपर्यंत असे असेल. 22 ते 25 ऑक्टोबरच्या पुण्यातील तापमानातही 16-17 अंश सेल्सिअस इतकी घट होईल. मात्र, दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात समुद्राच्या उष्ण तापमानामुळे चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा अनुकूल कालावधी आहे.
2022 मध्ये मॉन्सून नंतरच्या काळात अरबी समुद्रावर कोणतेही उष्णकटिबंधीय वादळ निर्माण झाले नाही.त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची सांख्यिकीय शक्यता अधिक आहे. भारतातील समुद्रात उष्णकटिबंधीय वादळ तयार झाल्यास हिंदी महासागर क्षेत्रातील चक्रीवादळांना नाव देण्याच्या सूत्रानुसार त्याला 'तेज' चक्रीवादळ असे नाव दिले जाईल.
हेही वाचा